कल्लोळ तिर्थाचे महत्त्व :
असे म्हणतात आई तुळजाभवानी अभिषेकासाठी साक्षात ब्रह्मदेवांनी विश्वकर्मांना कुंड तयार करण्यास सांगीतले. व सर्व पृथ्वीवरील तिर्थाना विनंती केली या ठिकाणी येण्याची , तेंव्हा सर्व तिर्थ या कुंडात आले व त्यांचा कल्लोळ माजला .ते कल्लोळ तिर्थ झाले.
आजही भक्त आई तुळजाभवानी दर्शनास जाण्या आगोदर या कल्लोळात आंघोळ करतात. पुर्वी पासुन मान्यता आहे की चर्म विकार रोग ईत्यादी या मध्ये स्नान केल्यास दुर होतात. या मध्ये त्रिवेणी संगम असल्यामुळे यास दक्षीणेतील प्रयागराज देखील संबोधतात.
यामध्ये पश्चिमेस तोंड करून आंघोळी केली जाते.
तुळजापुरकरांना काशी/ प्रयागराज यात्रा वर्ज असल्याने ते काशीगंगा स्नान गायमुखात तर त्रिवेनी प्रयाग स्नान कल्लोळ तिर्थ येथे संपन्न करतात.
जगदंब 🙏🏻
श्री तुळजाभवा
コメント