वसुंधरा संजीवनी मंडळ यांच्या वतीने मुरबाड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम आदरणीय आनंद भागवत #anandbhagwat काका यांच्या अत्यंत तेजस्वी कार्यशैलीतून घडून येत आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव आज सहकुटुंब घेण्याचा योग आला. आमचे काही सहकारी मित्र व कुटुंबीय आणि वयाच्या 89 व्या वर्षी देखील चैतन्याचा खळाळता प्रवाह असलेले आनंद भागवत काका त्यांच्यासोबत आजचा दिवस सत्कारणी लागला. ज्या तालुक्यातून मुंबई साठी पाणीपुरवठा होतो त्याच तालुक्यात मार्च नंतर प्यायला पाणी मिळत नाही. अनेक माता भगिनींना डोक्यावर घागर घेऊन पाण्याच्या शोधार्थ फिरावे लागते. नेमका हा पाण्याचा प्रश्न हेरून भागवत काकांनी या परिसरात जलसंधारणाचे अनोखे कार्य करून आपल्या भगीरथ प्रयत्नांनी अनेक लक्ष लिटर पाणी वाचवलं आहे. श्री विश्वजीत नामजोशी यांचे देखील या कामी मोठे योगदान आहे. डॉ सुरोशे यांच्याघरी सुग्रास वनभोजन झाले. अनोख्या 'आरव' जलसिंचन प्रकल्पाची देखील पाहणी केली. ध्येयाने झपाटून जाणारी माणसं किती मोठ काम करू शकतात त्याचा प्रत्यय आला. नाना पालकर यांच्या शब्दात
चला निघूया सरसावोनी
देशाच्या उद्धरणी
असं म्हणत चालू झालेल्या कामाला आपण आवर्जून एकदा तरी भेट द्यावी.
भागवतकाका स्वतः क्षेत्र भेटीला दिवसभर सोबत असतात
अधिक माहितीसाठी संपर्क
८९२८५११४१२
ठाण्यातील कॅडबरी येथून 6:45 वाजता गाडी निघते व संध्याकाळी सात पर्यंत आपण ठाण्यात घरी येतो. दिवसभरामध्ये एक नाश्ता व एक जेवण ते देखील वनभोजन (शेतातील ताजी भाजी व अन्य घरगुती पदार्थांची रेलचेल असते). दिवसभराचे (भोजना सह प्रवास खर्च धरून) केवळ दोनशे रुपये वसुंधरा संजीवनी मंडळ घेते.
#vasundharasanjivani
डॉ प्रशांत धर्माधिकारी
コメント