चलो वेरुळ... चलो वेरुळ... चलो वेरूळ...
प्रभु श्री विश्वकर्मा व त्याच्या प्रकट स्थानाविषयी माहिती
जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या वेरुळ, छ. संभाजीनगरची आख्यायिका वेगळीच आहे. वेरुळच्या लेणी या छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहेत. सृष्टी निर्माता प्रभू श्री विश्वकर्मा यांचे पावन श्री विश्वकर्मा कुंड तेथे आहे. त्यामध्ये प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या पायाचे ठसेही आहेत. स्थापत्य आणि शिल्पकलेचा जगातील सर्वात अद्भुत संगम येथे पाहवयास मिळतो. येथे असलेल्या 34 गुफामधील लेण्यांवर बौद्ध, हिंदू आणि जैन पंथांचा प्रभाव दिसून येतो.
धर्माच्या शिकवणीचे अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. 13 ते 29 या हिंदू लेणी म्हणून ओळखल्या जातात. या लेण्यांमध्ये हिंदू पुराणातील ग्रंथानुसार शिल्परचना करण्यात आली आहे. देवी- देवतांच्या अनेक मूर्ती, प्रणय क्रीडामग्न देवता तसेच रामायण, महाभारतातील अनेक प्रसंग या ठिकाणी कोरण्यात आली आहेत. या लेण्यांची निर्मिती एवढ्या भव्य स्वरुपात करण्यात आली आहे की, आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही.
अशा या जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या वेरुळ या ठिकाणी भगवान श्री विश्वकर्मा प्रकट झाले, हे आम्हा विश्वकर्मीय समाजाचे भाग्य होय. प्रभू श्री विश्वकर्मा हे देवांचे वास्तुकला तज्ज्ञ आहेत. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत.
प्रभू श्री विश्वकर्मा यांनी भगवान श्रीकृष्णसाठी द्वारका, पांडवा- - साठी हस्तीनापुर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. भगवान श्री विश्वकर्मा यांनी 14 ब्रह्मांडांची रचना केली. त्यामध्ये वायुमंडळ, कैलास, वैकुंठ, ब्रह्मपुरी, इंद्रपुरी, स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक इत्यादींची रचना केली होती.
#vishwakarma #मराठीताज्याबातम्या #kolhapurnews #india
コメント